नवाजुद्दीनची मुलगी बॉलीवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्याने स्वत: केला खुलासा

Nawazuddin Siddiqui| बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीनने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. त्याच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले आहे. सध्या अनेक स्टारकिड्स देखील बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. यातच आता नवाजुद्दीनने लेक शोराच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर येण्याच्या योजनांबद्दल भाष्य केले आहे.
नवाजुद्दीनची लेक शोरा लवकरच इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. शोरा सिद्दिकी ही १३ वर्षांची असून ती सध्या अभिनयाचे धडे गिरवत असल्याचे सांगितले जात आहे. नुकतेच एका मुलाखतीत नवाजुद्दीन म्हणाला की, “शोराने तिची स्वप्नं पूर्ण करावीत. मी तिचं अॅक्टिंग स्कूमध्ये अॅडमिशन केलं आहे. जर तिला अॅक्टिंगमध्ये करिअर करायचे असेल तर मला तिला ट्रेन करायला नक्की आवडेल.
पुढे तो म्हणाला, “अॅक्टिंग ही एक कला आहे. त्यामुळे ती पूर्ण तयार होईल. मी तिच्या पाठीशी नेहमी उभा आहे. जर तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल असे तर तुम्ही त्यासाठी खूप प्रयत्न करायचे हवे. मेहनतीने आणि मनापासून ती गोष्ट करायला हवी’, असे नवाजुद्दीनने सांगितले.
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तो ‘हड्डी’, ‘बजरंगी भाईजान’, ‘गँग ऑफ वासेपूर’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. यानंतर तो लवकरच ‘सेक्शन 108, अद्भूत, बोले चुडियाँ या चित्रपटात दिसणार आहे.





