Navratri colours 2021 : आज परिधान करा ‘पांढरे’ वस्र

मुंबई – नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते. स्कंदमातेला पांढरा रंग आवडतो. आज पंचमीच्या पाचव्या दिवशी, 

सोमवारी सर्वशक्‍तिमान देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी पांढरे रंगाचे कपडे घालावे. पांढरा रंग शुद्धता आणि निरागसपणाचे प्रतीक आहे.

स्कंदमाता हे देवीचे पाचवे रूप. या रूपात ती युद्धाचा देव असलेला स्कंद किंवा कार्तिकेय याची माता म्हणून आहे. यामध्ये देवीच्या मांडीवर मूल आहे. हा अवतार एका आईच्या पवित्र प्रेमाचे द्योतक आहे. 

जेव्हा भक्‍त तिचे पूजन करतात तेव्हा त्यांच्या अंतःकरणातील शांती, पावित्र्य आणि प्रार्थना याचेसुद्धा ते सांकेतिक आहे आणि म्हणूनच या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करावी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.