Navpreet Singh : पोर्तुगालमधून कुख्यात ड्रग्ज माफिया नवप्रीत सिंह याचे भारताकडे प्रत्यार्पण
पोर्तुगालमधून कुख्यात ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपी नवप्रीत सिंह (Navpreet Singh) याचे प्रत्यार्पण करण्यात आले आहे.

Navpreet Singh : पोर्तुगालमधून कुख्यात ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपी नवप्रीत सिंह (Navpreet Singh) याचे प्रत्यार्पण करण्यात आले आहे. तो तुर्कस्तानात नवाब या नावाने राहत असल्याची माहिती असून, पंजाबमधील ड्रग्ज तस्करी नेटवर्कशी त्याचे संबंध असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानमार्गे ड्रग्ज आणि शस्त्रांची तस्करी तसेच आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंधित प्रकरणांमध्ये तपास यंत्रणा त्याची चौकशी करत आहेत.
या कामगिरी बद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व संबंधित यंत्रणांचे अभिनंदन केले आहे.अमित शहा म्हणाले, अंमली पदार्थांच्या तस्करीतील कुख्यात सूत्रधार नवप्रीत सिंग (Navpreet Singh) याला तुर्कीमधून भारतात परत आणण्यात मिळालेले यश ही मोदी सरकारने केलेली एक ऐतिहासिक कामगिरी आहे.
नवाब विर्क या बनावट ओळखीचा वापर करून तुर्कीचे नागरिकत्व मिळवलेल्या या व्यक्तीने अफगाणिस्तानातून भारतात हेरॉइन आणि मेथाम्फेटामाइनची तस्करी सुरूच ठेवली होती. आमच्या तपास यंत्रणांनी त्याचा मागोवा घेत त्याची खरी ओळख उघड करत एकावर एक घेतलेले त्त्याचे मुखवटे फाडून काढले आणि तुर्कीमधून त्याची हद्दपारी सुनिश्चित केली. आज त्याला भारतात आणण्यात आले असून, अंमली पदार्थांची तस्करी आणि इतर गुन्ह्यांच्या आरोपांखाली त्याला (Navpreet Singh) तुरुंगात डांबण्यात आले आहे.
अंमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रत्येक संघटित प्रयत्नांचा (नार्को-कार्टेल) समूळ नायनाट करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. तसेच मोदी सरकारने फरारी आरोपींना परत आणण्यासाठी एक समन्वित मोहीम सुरू केली आहे. 2019 पासून ते ऑगस्ट 2026 पर्यंत, 36 देशांमधून एकूण 288 फरारी आरोपींना भारतात परत आणण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.






