Navneet Rana – भारत आणि पाकिस्तान दरम्यान सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यातच माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात नवनीत राणा यांनी मुंबईच्या खार पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. नवनीत राणा यांना यापूर्वीही पाकिस्तानमधून धमकीचे मेसेज आले आहेत. नवनीत राणा यांना आलेल्या धमकीच्या संदेशात म्हटले आहे की, ‘हिंदू शेरनी हनुमान चालीसा पढने वाली थोडे दिन की मेहमान है. जल्दी उडने वाली है’. पाकिस्तानातील वेगवेगळ्या फोनवरून या धमक्या नवनीत राणा यांना आल्या आहे. त्यानंतर राणा यांच्याकडून ही माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी तपासही सुरु केला आहे. नवनीत राणा यांना आलेली ही धमकी आंतरराष्ट्रीय पातळीवरुन आली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांना केंद्रीय यंत्रणेची मदत घ्यावी लागणार आहे.