अमरावती : परिवार एकत्र येणे ही आपली संस्कृती आहे आणि आपण ती जपली पाहिजे, पण आज संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे दोन भाऊ एकत्र आले ते फक्त सत्ता आणि खुर्चीसाठी. सत्तेत आल्यानंतर फक्त पैशासाठी आणि तोड्या करण्यासाठी दोन भाऊ एकत्र आले आहेत. ठाकरे परिवार हे मजबूरीचे नाव झालेले आहे, असा निशाणा अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.बरेच नौटंकी लोक आहेत, जे आज बाहेर फिरून सांगत आहेत आमदारांना मारून टाका. तुम्ही चार वेळा आमदार होते दोन वेळा मंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांसाठी तुमची पोटदुखी बाहेर नाही आली, असा हल्लाबोल नवनीत राणांनी बच्चू कडूंवरतीही केला. नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आपल्या राहत्या घरासमोर अंध, अपंग, कृष्ठरोगी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा देऊन राणा दाम्पत्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.