Navjot Kaur Sidhu : निवृत्त क्रिकेटपटू आणि पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांची पत्नी डॉ. नवजोत कौर सिद्धू (Navjot Kaur Sidhu) यांनी काँग्रेसला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी काँग्रेसला अलविदा म्हटले आहे. जो पक्ष मेहनती आणि लायक नेत्यांचे ऐकत नाही आणि सर्व निर्णय खासगी स्वार्थसाठी घेतले जातात,वाशा पक्षातून बाहेर पडताना आपल्याला विशेष आनंद होत आहे, असे डॉ. नवजोत कौर (Navjot Kaur Sidhu) यांनी सांगितले आहे.काँग्रेस पक्ष सोडण्यामागे पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वडिंग आहेत. राजा वडिंग यांनी काँग्रेसला बर्बाद केल्याने आपण काँग्रेस सोडत आहोत असे डॉ. नवजोत कौर सिद्धू यांनी म्हटले आहे. Navjot Kaur Sidhu। मात्र, काँग्रेसने आधीच नवजोत कौर यांची पदावरुन गच्छंती केली आहे. पंजाब काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष म्हणून राजा वडिंग असल्याची टीकाही डॉ. नवजोत कौर सिद्धू यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी संधान साधून काँग्रेसला बर्बाद करत स्वत:ला जेल जाण्यापासून वाचवले आहे. त्यांनी आम आदमी पार्टीशी संगनमत करुन किरकोळ लाभासाठी पार्टीला विकले आहे. माझ्यासाठी तुमच्याकडे निलंबन पत्र तयार होते, परंतू त्या सुमारे १२ ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचे काय ? जे नवजोतला नुकसान पोहचवण्यासाठी मजीठिया सोबत काम करत होते? तुम्ही नवजोत सिद्धूला हरवण्यासाठी त्या सर्वांना मोठ-मोठ्या पदांवर बसवले. 500 कोटींच्या आरोपाबद्दल पक्षाने काढले डिसेंबरमध्ये काँग्रेसने नवज्योत कौर सिद्धू यांना पक्षातून निलंबित केले होते. नवज्योत कौर यांनी मुख्यमंत्रीपदासाठी ५०० कोटी रुपयांची बोली लागते असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर काँग्रेसने त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द केले. काँग्रेसमध्ये जो कोणी ५०० कोटी रुपयांची सुटकेस देतो तो मुख्यमंत्री होतो असे त्या म्हणाल्या होत्या. त्यामुळे वाद झाल्यानंतर नवज्योत कौर यांनी आपले विधान तोडूनमोडून सादर केल्याचा दावा केला होता.