Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाला ‘दि. बा. पाटील’ यांचे नाव देण्याचा मार्ग मोकळा! खासदार सुरेश म्हात्रेंनी दिली महत्त्वाची माहिती
Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर येणार आहे.

Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत शेतकरी नेते डी.बी. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल, अशी माहीती भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे. म्हात्रे हे एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
म्हात्रे म्हणाले, केंद्रीय नागरी विमान मंत्री राम मोहन नायडू यांनी आश्वासन दिले आहे की हा प्रस्ताव मंत्रिमंडळ स्तरावर लवकरात लवकर विचारात घेतला जाईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते डी.बी. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडला जाणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारे दोन्ही याबाबतीत सकारात्मक आहेत. या विमानतळाला दिवंगत नेत्याचे नाव देण्याची मागणी संसदेत आणि केंद्र सरकारसमोर वारंवार उपस्थित करण्यात आली आहे.
त्यामुळे येत्या काही दिवसांत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते डी.बी. पाटील यांचे नाव दिले जाईल, असे म्हात्रे म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामकाज २५ डिसेंबर २०२५ रोजी सुरू झाले असून, ते मुंबई महानगर क्षेत्रासाठी दुसरे विमानतळ म्हणून कार्यरत आहे.





