महागाईचा भडका उडणार; नैसर्गिक वायूच्या किमतींमध्ये तब्बल 62 टक्के वाढ
Updated On:

नवी दिल्ली – औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरल्या जात असलेल्या नैसर्गिक वायूच्या किमतीमध्ये वायू निर्मात्या कंपन्यांनी तब्बल 62 टक्के वाढ केली आहे.
त्यामुळे आगामी काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. हा वायू वीज, खत, सीएनजी, निर्मितीसाठी वापरला जातो. यासाठीचा कच्चा माल महाग झाल्यामुळे ही दरवाढ करावी लागत असल्याचे नैसर्गिक वायू तयार करणाऱ्या कंपन्यांनी म्हटले आहे. आगामी काळामध्ये त्यामुळे खत, वीज आणि इतर बाबींच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.





