Raju Shetty | शक्तीपीठ महामार्गावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. स्थानिक शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध असल्याचे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आज सांगली-कोल्हापूर मार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार होते. परंतु या आंदोलनाआधीच पोलीसांनी राजू शेट्टी यांना त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले आहे. नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी उर्वरित जमीन भूसंपादन करण्यासाठी शेतकऱ्यांना चौपट मोबदला द्यावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली होती. तर याच मागणीसाठी त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. याप्रकरणी आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार होती. मात्र आंदोलनापूर्वीच स्वाभिमानीच्या सर्व कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे. Raju Shetty | रत्नागिरी-नागपूर महामार्गातील बाधित शेतकऱ्यांच्या उपोषणाचा पाचव्या दिवशी तब्येत खालावली. पण प्रशासनाकडून या आंदोलनाची कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आज रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. याचपार्श्वभुमीवर राजू शेट्टी यांना ताब्यात घेण्यासाठी शिरोळ निवासस्थानी पोलिस दाखल झाले. सकाळी 6 वाजता माजी खासदार शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देवेंद्र फडणवीस शक्तीपीठ महामार्गासाठी आग्रही शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा महामार्ग नागपूरपासून सिंधुदुर्गपर्यंत १२ जिल्ह्यांमधून जाणार असून, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शक्तीपीठांना जोडणारा आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या औद्योगिक तसेच आर्थिक विकासालाही चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. तसेच या महामार्गामुळे शक्तीपीठ आणि औद्योगिक केंद्रे जोडली जातील. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील उद्योगांना चालना मिळेल. राज्यातील वाहतुकीचा वेग आणि सुविधा सुधारतील. पुरवठा साखळी मजबूत होईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील. शेतकऱ्यांना अधिक चांगल्या रीतीने बाजारपेठेपर्यंत पोहोचता येईल. हा केवळ रस्ता नसून महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले होते. 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार दरम्यान, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या माहूर, तुळजापूर, अंबेजोगाई ही तीन शक्तीपीठे या महामार्गाला जोडली जाणार आहेत. तर राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. हेही वाचा: Javed Akhtar : जावेद अख्तर घेतायेत पाकिस्तानी गायकाचा शोध; ट्विटकरत दिली सर्वात मोठी ऑफर !