NATO Spy Arrest : नाटो लष्करी मुख्यालयामध्ये हेरगिरी करणाऱ्या कॅनडाच्या महिलेला अटक
नाटोच्या लष्करी मुख्यालयामध्ये (NATO Spy Arrest) हेरगिरी करण्याच्या आरोपावरून कॅनडाची नागरिक असलेल्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

NATO Spy Arrest : नाटोच्या लष्करी मुख्यालयामध्ये (NATO Spy Arrest) हेरगिरी करण्याच्या आरोपावरून कॅनडाची नागरिक असलेल्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे. नाटोच्या लष्करी मुख्यालयामध्ये इंटर्न म्हणून ही महिला कार्यरत होती, असे बेल्जियमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नाटोच्या (NATO Spy Arrest) सुरक्षा सेवेने बेल्जियमच्या लष्करी गुप्तचरांकडे या हेरगिरीबद्दल संशय व्यक्त केल्यानंतर बेर्जियमच्या फेडरल प्रोसिक्युटर्सच्या कार्यालयाने या प्रकरणी तपास सुरू केला होता. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी संशयित असलेल्या कॅनडाची नागरिक असलेल्या मूळ चिनी वंशिय महिलेच्या घरावर आणि नाटोच्या मोठ्या कमांड सेंटरवर छापा घालून या महिलेला ताब्यात घेतले.
ही महिला एका त्रयस्थ देशासाठी हेरगिरी करत असून एका गुन्हेगारी टोळीची सदस्या असल्याचा संशय आहे, असे तपास अधिकाऱ्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे. नाटोचे लष्करी मुख्यालय मित्र देशांच्या आघाडीचे हे शेप नावाचे मुख्यालय आहे. बेल्जियमच्या दक्षिणेकडे फ्रान्सच्या सीमेजवळ मोन्स शहरात हे मुख्यालय आहे. शेप मुख्यालयातील लष्करी अधिकारी संयुक्तपणे राबवण्याच्या लष्करी कारवाईची योजना येथे आखत असतात.
सध्या तरी नाटो (NATO Spy Arrest) किंवा शेप येथून लष्करी कारवाईबाबतची कोणतीही गोपनीय माहिती किंवा सध्या सुरू असलेल्या ऑपरेशनवर काही परिणाम झालेला नाही. आपल्या जबाबदाऱ्या कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पाडण्यात शेप समर्थ आहे, असे शेपचे प्रवक्ते कर्नल मार्टिन एलओडोनेल यांनी सांगितले.
कॅनडा आणि बेल्जियम हे दोन्ही देश नाटोचे सदस्य आहेत. नाटोने २०२१ मध्ये रशिया आणि मध्य पूर्वेतील सक्रिय धोक्यांसोबतच चीनला सुरक्षेसाठी आव्हान म्हणून घोषित केले होते.






