‘ही ट्रम्पची पॉवर प्ले स्टाईल, पण भारतावर…’ ; नाटो सल्लागाराने ट्रम्पच्या ‘टॅरिफ वॉर’ची हवाच काढली

NATO Advisor F. Crystal Kaur। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाची अनेक पातळ्यांवर छाननी केली जात आहे. केवळ भारतच नाही तर अमेरिकन आर्थिक तज्ज्ञ आणि धोरणकर्तेही या धोरणावर टीका करत आहेत. नाटो सल्लागार एफ क्रिस्टल कौर यांनी,”ही ट्रम्प यांची पॉवर प्लेची शैली आहे, हे त्यांचे हात फिरवण्याचे धोरण आहे.
नाटो सल्लागार एफ क्रिस्टल कौर यांनी ट्रम्प टॅरिफ विषयी बोलताना, “ट्रम्प हे भारत आणि जपानसह इतर अनेक देशांपर्यंत आपला मुद्दा पोहोचवण्यासाठी करत आहेत असे त्यांना वाटते. ते आपला मुद्दा पोहोचवण्यासाठी ही पद्धत अवलंबत आहेत परंतु ही पद्धत भारतावर फारशी प्रभावी ठरेल असे त्यांना वाटत नाही.” असे म्हणत त्यांनी टॅरिफ वॉरची हवाच काढून टाकली आहे.
भारतीय वस्तूंवर ५०% कर लादण्याच्या निर्णयावर टीका करताना एफ क्रिस्टल कौर यांनी, “या निर्णयाचा दोन्ही देशांमधील व्यापारावरच नव्हे तर व्यापक अमेरिका-भारत संबंधांवरही नकारात्मक परिणाम होईल” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
या निर्णयामुळे मी खूप निराश NATO Advisor F. Crystal Kaur।
ट्रम्पवर निराशा व्यक्त करताना एफ. क्रिस्टल कौर यांनी, “मी डोनाल्ड ट्रम्प आणि या निर्णयामुळे खूप निराश आहे, मला वाटते की भारतावर ५० टक्के कर लादणे हे केवळ दोन्ही देशांमधील व्यापारासाठीच नाही तर एकूण संबंधांसाठी देखील हानिकारक आहे, विशेषतः जेव्हा ते तयार होण्यास बराच वेळ लागला आहे.” असे त्या म्हणाल्या. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी, “मला वाटते की हे भारत सरकारबद्दल अविश्वास निर्माण करत आहे.”असे म्हटले.
एफ. क्रिस्टल कौर यांनी,”अणुकरारानंतर भारत-अमेरिका संबंध खूपच नाजूक आहेत. माजी राष्ट्रपती क्लिंटन आणि ओबामा यांनी हे संबंध मजबूत करण्यासाठी कठोर परिश्रम केले. आता सध्याच्या घडामोडींमुळे खूप अविश्वास निर्माण होत आहे” असे सांगितले.
ही ट्रम्पची पॉवर प्लेची शैली NATO Advisor F. Crystal Kaur।
नाटोला धोरणात्मक मुद्द्यांवर सल्ला देणाऱ्या एफ. क्रिस्टल कौर म्हणाल्या, “मला वाटते की ही ट्रम्पची पॉवर प्लेची शैली आहे. भारताला त्यांच्या मुद्द्यावर सहमत होण्यास भाग पाडणे आणि जपानसह इतर देशांवर दबाव आणणे, ज्यात अमेरिकेचा धोरणात्मक मित्र असलेला जपान देखील समाविष्ट आहे. परंतु मला वाटते की हे फार प्रभावी ठरणार नाही.”
रशियातील अमेरिकेचे माजी राजदूत मायकेल मॅकफॉल यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की जेव्हा चीन रशियन तेलाचा खूप मोठा खरेदीदार आहे, तेव्हा अमेरिका भारताला का लक्ष्य करत आहे. मॅकफॉल यांनी विचारले, “भारत रशियन तेल आयात करत असतानाही ट्रम्प भारतीय वस्तूंवर २५% टॅरिफ का लादत आहेत याचे कोणतेही स्पष्टीकरण नाही, परंतु चीन अधिक रशियन तेल आयात करत असला तरी ते चिनी वस्तूंवर असे का करत नाहीत. ट्रम्प प्रशासनातील कोणाला याबद्दल स्पष्टीकरण विचारू शकेल का?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
आता पुतिन ट्रम्प भेटीकडे लक्ष
भारताच्या उच्च कर धोरणांचा आणि रशियाकडून कच्चे तेल खरेदीचा हवाला देत ट्रम्प यांनी भारतावर ५०% कर लादला आहे. ट्रम्प युक्रेनशी युद्धबंदीसाठी पुतिनवर दबाव आणत आहेत आणि भारतावर रशियाच्या युद्धयंत्रणेला निधी देत असल्याचा आरोप करत आहेत. या प्रकरणातील एक महत्त्वाचा विकास म्हणजे पुढील आठवड्यात पुतिन आणि ट्रम्प यांच्यातील संभाव्य बैठक. जर यातून काही सकारात्मक घडले तर जगातून तणावाचे ढग दूर होऊ शकतात.





