satara | राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्षपदी पारगावच्या पै. उदय यांची निवड

पुसेसावळी, (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदश्चंद्र पवार) सातारा जिल्हा युवक उपाध्यक्षपदी पारगाव (ता. खटाव) येथील पैलवान उदय अशोक गुरव यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या सूचनेने जिल्हाध्यक्ष मकरंद बोडके यांनी ही नियुक्ती केली आहे.
आ.शशिकांत शिंदे यांच्या हस्ते उदय गुरव यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. उदय गुरव पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व करत असून जयंत फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी कार्यरत आहेत. संघटनेला बळ देत त्यांनी विविध सामाजिक कार्यक्रम राबविले आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून आगामी निवडणुकीमध्ये पक्षाला बळ देण्याचे काम युवकांच्या मार्फत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा पातळीवर काम करताना पक्षातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील युवकांना संघटित करून पक्षाला उभारी देण्यासाठी काम करणार असल्याची ग्वाही उदय गुरव यांनी निवडीनंतर बोलताना दिली.
त्यांच्या निवडीबद्दल आ. जयंत पाटील, मेहबूब शेख, खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, सारंग पाटील, सागर साळुंखे, रमाकांत बोडके, सुहास पिसाळ, नितीन भोसले यांनी अभिनंदन केले.





