पिंपरी | राष्ट्रवादीतर्फे महायुतीच्या कळ्या कारभाराची दहिहंडी साजरी

पिंपरी, (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने महायुतीच्या काळ्या कारनाम्यांची दहीहंडी आज साजरी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहर कार्यालयासमोर काळे फुगे लावून दहीहंडी फोडण्यात आली.
या आगळ्यावेगळ्या दहीहंडीत महाराष्ट्रात वाढणारी बेरोजगारी, गुन्हेगारी, महिला तसेच बालकांवरील होणाऱ्या अत्याचारात सातत्याने वाढ, युवा पिढीचे नुकसान, महाराष्ट्राचा स्वाभिमानाची गळचेपी,
शैक्षणिक दुरावस्था, निकृष्ट दळणवळण, आरोग्य सेवांचा अभाव, सामाजिक अन्याय, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, अर्थव्यवस्था कोलमडणे आदी महाराष्ट्राला भेडसावत असणाऱ्या भीषण समस्यांची दहीहंडी फोडून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
यावळी शहराध्यक्ष तुषार गजानन कामठे, माजी नगरसेवक अजित गव्हाणे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, विनायक रनसुभे, गणेश भोंडवे, प्रदेश युवक सरचिटणीस प्रशांत सपकाळ,
कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, विशाल काळभोर, वरिष्ठ उपाध्यक्ष धम्मराज साळवे, काशिनाथ जगताप, ओबीसी सेल अध्यक्ष विशाल जाधव, राजेश रोचिरामानी, सुशांत खुरासने, रोहित जाधव आदी उपस्थित होते.





