Pmc Election : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचा भव्य रोड शो पार पडला. या रोड शोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रोड शोदरम्यान अजित पवार यांनी मतदारांशी थेट संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विकासकामांचा आढावा मांडला. पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असून, प्रभाग क्रमांक २६ मधील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षणाच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ढोल-ताशांच्या गजरात, पक्षाचे झेंडे आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. रोड शोच्या मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करत अजित पवार व उमेदवारांचे स्वागत केले. या वेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रोड शोमुळे प्रभाग क्रमांक २६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार अधिक वेग घेत असल्याचे चित्र दिसून आले असून, आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.