China border – चीनच्या सीमेलगतची सुरक्षा भारताने आणखी मजबूत केली आहे. सज्जतेच्या उद्देशातून सीमाभागात वर्ष २०२० पासून भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) दलाच्या २९ नव्या चौक्या उभारण्यात आल्या आहेत. भारत आणि चीनमधील सीमेची लांबी ३ हजार ४८८ किलोमीटर इतकी आहे. त्या सीमेलगत वर्ष २०२०-२१ मध्ये आयटीबीपीच्या १८० चौक्या होत्या. ती संख्या वाढून २०९ इतकी झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने वर्ष २०२४-२५ साठी जारी केलेल्या अहवालातून ती माहिती उपलब्ध झाली. भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात वर्ष २०२० मध्ये संघर्ष झाला. china त्या पार्श्वभूमीवर, भारताने सीमेलगतची सुरक्षा आणखी मजबूत करण्यावर भर दिल्याचे स्पष्ट होत आहे. आयटीबीपीच्या चौक्या हिमालय पर्वतरांगांलगत ९ हजार ते १८ हजार ७५० फूट उंचीवर उभारण्यात आल्या आहेत. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान या देशांच्या सीमांलगतही आणखी चौक्या उभारल्या जाणार आहेत. त्यातून भारताने सीमांलगतची सुरक्षा अधिकाधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट होत आहे.