PM मोदींविरोधात कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार; नेमकं काय घडलं?

Congress complains on PM Modi| – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्याची खिल्ली उडवली. त्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप असल्याचे त्यांनी म्हटले. त्या टिप्पणीवर आक्षेप घेत कॉंग्रेसने सोमवारी मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली.
कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन मोदींच्या टिप्पणीविषयी नापसंती व्यक्त केली. त्या शिष्टमंडळात पवन खेडा, मुकूल वासनिक, सलमान खुर्शिद आदी नेत्यांचा समावेश होता. त्या भेटीत कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने इतर मुद्देही उपस्थित केले. मोदींची छायाचित्रे, कट-आऊटस् यांचा वापर सरकारी इमारती, महाविद्यालयांमध्ये केला जात आहे.
ती छायाचित्रे, कट-आऊटस् हटवण्याची मागणी कॉंग्रेसने केली. निवडणूक प्रचारावेळी लष्करी गणवेषातील मोदींच्या छायाचित्राचा गैरवापर सुरू आहे. Congress complains on PM Modi|
भाजपकडून तसे गैरप्रकार वारंवार होत असल्याने कारवाई व्हावी, असे साकडे आम्ही निवडणूक आयोगाला घातल्याची माहिती खेडा यांनी नंतर दिली. कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यावर भाजपने टीकेची झोड उठवली आहे. त्यावरून भाजप आणि कॉंग्रेसमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.
हेही वाचा:
पंकजा मुंडेंचं विधान चर्चेत,’ माझ्याकडे पैसे नाहीत, वर्गणी काढून मला घर बांधून द्या, मी मरेपर्यंत…’





