National Herald Case: राहुल गांधींची “ती’ विनंती ईडीने केली मान्य
Updated On:

नवी दिल्ली –कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी चौकशी लांबणीवर टाकण्याबाबत केलेली विनंती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मान्य केली. त्यामुळे राहुल यांची चौकशी आता 20 जूनला होईल.
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी राहुल यांची सोमवारपासून सलग तीन दिवस चौकशी करण्यात आली. एक दिवसाच्या विश्रामानंतर त्यांना चौकशीसाठी पुन्हा 17 जूनला बोलावण्यात आले. मात्र, व्यक्तिगत कारणास्तव ती चौकशी तीन दिवस लांबणीवर टाकण्याची विनंती राहुल यांच्याकडून करण्यात आली होती.
राहुल यांच्या आई आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना उपचारासाठी येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या समवेत राहण्याची गरज असल्याचे कारण राहुल यांनी ईडीला दिले.





