National Herald case | डी. के. शिवकुमार यांची पुन्हा चौकशी

नवी दिल्ली – कर्नाटक कॉंग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार सोमवारी पुन्हा नॅशनल हेराल्ड मनी लॉंडरिंग प्रकरणात चौकशीसाठी दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाले. त्यांनी या प्रकरणात ईडीपुढे हजर राहण्याची ही दुसरी वेळ आहे.
शिवकुमार यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांनी तपासासंदर्भात एजन्सीने मागितलेली सर्व कागदपत्रे सादर केली आहेत आणि समन्स पुढे ढकलण्याची मागणी करूनही त्यांना पुन्हा हजर व्हावे लागले आहे. गेल्या महिन्यात या प्रकरणात ईडीने त्यांची शेवटची चौकशी केली होती त्यानंतर आजही त्यांच्यावर पुन्हा प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
Jitendra Awhad : लोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा अतिशय भ्याड हल्ला – अजित पवार
नॅशनल हेराल्ड मनी लॉंडरिंग प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे आणि पवन बन्सल यांसारख्या कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची ईडीने चौकशी केली आहे.





