राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा : ग्रीको-रोमन प्रकारात धनश्री फंडचे सुवर्णयश….

पुणे – भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ज्ञानेश्वर कटके आणि सुरेंद्रदादा पठारे फाउंडेशन आयोजित वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ग्रीको-रोमन प्रकारात महाराष्ट्राच्या प्रवीण पाटील, विश्वजित मोरे आणि धनश्री फंड यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून सुवर्णपदक मिळवले.
कै.विठोबा मारुती पठारे क्रीडा संकुल खराडी येथे ही स्पर्धा झाली. ग्रिकोरोमनमध्ये पुरुषांमध्ये १० वजनीगट व महिला विभागात २ वजनीगटाच्या कुस्त्या पार पडल्या. ग्रिकोरोमनमध्ये ६३ किलो गटाच्या अंतिम लढतीत प्रवीण पाटील याने दिल्लीच्या उमेशवर ८-० अशी मात करून सुवर्णपदक पटकावले. यानंतर ५५ किलो गटाच्या अंतिम फेरीत विश्वजित मोरे याने कर्नाटकाच्या अर्जुनवर मात करून सुवर्णपदक पटकावले. महिला विभागात धनश्री फंडने ५५ किलो गटात सुवर्णयश मिळवले.
#PKLSeason10 : प्रो कबड्डी लीगच्या 10 व्या हंगामात ‘हे’ आहेत टॉप-10 रेडर…
एमहाराष्ट्राच्या स्वरूप चौगुलेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. प्रवीण डोंगळे, अमृत रेडकर यांनी ब्राँझपदकाची कमाई केली. ग्रिकोरोमन विभागाची दिल्लीने २०० गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. महाराष्ट्र १२२ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर ११९ गुणांसह चंदीगडने तिसरा क्रमांक मिळवला.

