National Championship 2024 : वरिष्ठ महिला हॉकी स्पर्धेस आजपासून प्रारंभ…

National Championship 2024 ( Pune) – प्रतिष्ठेची १४ वी हॉकी इंडिया वरिष्ठ (सीनियर) महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आजपासून नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम खेळली जाणार आहे. या स्पर्धेत गतविजेता हॉकी मध्य प्रदेशसह उपविजेता आणि यजमान महाराष्ट्रासह देशभरातील २८ राज्यांचे सहभागी होतील.
११ दिवस रंगणारी राष्ट्रीय हॉकी स्पर्धा साखळी आणि बाद फेरी पद्धतीने (लीग-कम-नॉकआउट फॉरमॅट) खेळली जाणार आहे. सहभागी संघांना आठ गटांमध्ये विभागण्यात आले असून राऊंड-रॉबिन पद्धतीने प्रत्येक संघ एकमेकांशी झुंजतील. प्रत्येक गटातील अव्वल संघ बाद फेरीसाठी पात्र ठरेल. उपांत्यपूर्व फेरी २० मार्चपासून रंगेल.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ipl-where-is-kamran-khan-the-2009-ipl-star-who-could-bowl-140-kmph-deliveries/
त्यानंतर २२ मार्च रोजी उपांत्य फेरी आणि रविवार, २३ मार्च रोजी महाअंतिम फेरी होईल. पहिल्या दिवशी सहा सामने होणार असून सकाळी ७ वाजता सामन्यांना सुरुवात होईल. सायंकाळचा सामना उद्घाटन सह-यजमान , यजमान हॉकी महाराष्ट्र आणि हॉकी केरळ यांच्यात फ्लडलाइट्सखाली खेळवला जाईल.





