National Championship 2024 (Sr. Women’s Hockey) : पंजाबला हरवून मिझोराम उपांत्यपूर्व फेरीत…

14th Women’s National Hockey Championship 2024 in Pune :- हॉकी मिझोरामने हॉकी पंजाबचा ४-२ असा पराभव करत १४ व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पूल एफमधून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. अंतिम आठ संघांमध्ये स्थान मिळवणारा तो सातवा संघ ठरला.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी येथे सुरू असलेल्या स्पर्धेतील सोमवारच्या विजयामुळे हॉकी पंजाबने तिन्ही सामन्यांत विजय मिळवत हॉकी हिमाचल आणि हॉकी राजस्थानला मागे टाकत पूल एफमध्ये अव्वल स्थान पटकावले आणि आगेकूच केली. लालरिनपुयीने (सहाव्या आणि नवव्या मिनिटाला) तर कर्णधार एच. लालरुआतफेली (२६ व्या मिनिटाला) आणि मरीना लालरामघाकी (५४ व्या मिनिटाला) तर कर्णधार एच. लालरुआतफेलीने (२६ व्या मिनिटाला) दोन पेनल्टी कॉर्नरचे गोलात रुपांतर करताना हॉकी मिझोरामच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
हॉकी पंजाबकडून तरनप्रीत कौर (३५ व्या मिनिटाला) आणि राजविंदर कौरने (५१ व्या मिनिटाला) पेनल्टी कॉर्नरद्वारे प्रत्येकी एक गोल केला. विजयी हॅट्ट्रिकसह हॉकी मिझोराम संघाने हॉकी मध्य प्रदेश, हॉकी महाराष्ट्र, हॉकी झारखंड, हॉकी हरियाणा, हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा आणि हॉकी बंगालसोबत बाद फेरीत स्थान मिळवले. उपांत्यपूर्व फेरीतील आठवा संघ पूल जीमधून आगेकूच करेल.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/wpl-2024-rcb-prize-money-money-rained-on-champion-royal-challengers-bangalore/
उपांत्यपूर्व फेरीत हॉकी मध्य प्रदेशची गाठ हॉकी बंगालशी, हॉकी झारखंडची गाठ हॉकी मिझोरामशी आणि हॉकी हरियाणाची लढत हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशाशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीतील हॉकी महाराष्ट्राच्या प्रतिस्पर्ध्याचा निर्णय मंगळवारी होईल. त्यांचा सामना पूल जीमधील विजेत्यांशी होईल. सोमवारी झालेल्या अन्य लढतींमध्ये आसाम हॉकीने पूल डीमध्ये ली पुड्डुचेरी हॉकीचा २-१ असा पराभव केला.





