नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपकडेच राहणार? ; रायगडचा निर्णय शिंदे-पवार घेण्याची शक्यता

Nashik & Raigad Guardian Minister । राज्यातील दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद काही केल्या कमी होताना दिसत नाही. नाशिकची गिरीश महाजन तर रायगडची अदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर शिंदे गटाकडून यावर आक्षेप घेण्यात आले होते. कार्यकर्त्यांचा रोष आणि नेत्यांची नाराजी पाहता या दोन्ही जिल्ह्याच्या पाल्कमंत्रीपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. . आता महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अधिवेशन या पालकमंत्र्यांशिवायच संपल्याचे दिसून आले. मात्र, एवढ्या सगळ्यात नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपकडेच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिंदे -पवार निर्णय घेणार Nashik & Raigad Guardian Minister ।
गेल्या तीन महिन्यांपासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद सुरूच आहे. महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले. मात्र, अजूनही नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोर्टात गेला आहे. दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
नाशिकचे पालकमंत्री पद भाजपकडेच राहणार? Nashik & Raigad Guardian Minister ।
नाशिकचे पालकमंत्रिपद हे भाजपकडेच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांच्या देखरेखीखाली जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाजपकडून नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत आग्रही भूमिका घेण्यात आल्याचे दिसून येते. मात्र नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाची अधिकृत घोषणा नेमकी कधी होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी नाशिक शहरातील युवा उद्योजकांसोबत चर्चा सत्रात सहभाग घेतला होता. या चर्चासत्रात देवेंद्र फडणवीस यांना युवा उद्योजकांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या तिढ्याबाबत प्रश्न विचारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोपर्यंत जिल्ह्याला पालकमंत्री जाहीर होत नाही, तोपर्यंत चार्ज मुख्यमंत्र्यांकडे असतो. पण लवकरच नाशिकचा पालकमंत्री जाहीर करू, असे वक्तव्य केले होते.
हेही वाचा
राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २५५५ कोटी; जाणून घ्या कसे?





