Nashik News : हृदयद्रावक ! नाशिकच्या काश्यपी धरणात बुडून चौघांचा मृत्यू
नाशिक जिल्ह्यात पिकनिकसाठी (Nashik News) गेलेल्या एक दाम्पत्य आणि दोन किशोरवयीन मुलांचा काश्यपी धरणात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली.

Nashik News : नाशिक जिल्ह्यात पिकनिकसाठी (Nashik News) गेलेल्या एक दाम्पत्य आणि दोन किशोरवयीन मुलांचा काश्यपी धरणात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, मखमलाबाद येथील (Nashik News) रहिवासी सचिन कैलास ठोंबरे (३०) आणि त्यांची पत्नी रोहिणी (२५) हे आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह आणि शेजारी राहणाऱ्या दोन मुलांसोबत, केतन अनिल पवार (१६) आणि कौशल अनिल पवार (१४) हे या धरणाच्या जलाशयावर गेले होते.यात दाम्पत्य आणि दोन किशोरवयीन मुले पाण्यात बूडाली.
संगीता घाडगे नावाची एक महिला तिथून जात असताना तिला लहान मूलगी जलाशयाच्या दिशेने जाताना दिसली. तिने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्या मुलीला वाचवले. पाण्याचा दिशेने बोट दाखवत ती मुलगी सतत मम्मी, पप्पा असे रडत होती.
धराच्या काठावर चपलांच्या जोड्या पडलेल्या दिसल्यानंतर घाडगे यांनी स्थानिक रहिवाशांना सावध केले, त्यानंतर स्थानिकांनी ठोंबरे दाम्पत्य आणि त्या दोन मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.
रोहिणीच्या मोबाईल फोनवर आलेला एक कॉल उचलल्यानंतर मृतांची ओळख (Nashik News) पटली. नंतर अधिकाऱ्यांना असे आढळून आले की, रोहिणी गर्भवती होती. हर्सूल पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.






