नात्याला काळिमा ! नाशिकमध्ये बापानेच केला मुलीवर अत्याचार

नाशिक : बदलापूरमध्ये एका शिपायाने 4 वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर अत्याचार केल्याची घटना ताजी असताना नाशिकमधून बाप – लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये वडिलांनीच आपल्या मुलीवर जबरदस्तीनं अत्याचार केला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
नाशिकच्या ओझर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे.‘‘माझ्या सावत्र वडिलांनी मला बकऱ्या चरायला आणण्याच्या बहाण्याने उसाच्या शेतात नेलं. खूप दूर घेऊन गेले. तिथे त्यांनी मला कपडे काढायला लावले. मला म्हणाले तुला सगळं करायचं आहे. मोठी दीदी झाल्यावर तुला सगळं करायचं आहे. मी पळायला लागले तर मला हातपाय धरुन त्यांनी ओढलं आणि उसाच्या बागेत नेलं जबरदस्ती केली’’, असं जबाब पीडितेनं पोलिसांना दिला आहे.
मुलीच्या तक्रारीनंतर सावत्र बापावर विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सावत्र बापाला अटक केली आहे. या घटनेमुळे ओझर परिसरात खळबळ उडाली आहे.





