CNG Price Hike : महाराष्ट्रात सीएनजीच्या दरात मोठी वाढ; आता मोजावे लागणार इतके पैसे
CNG Price Hike : MNGL ने नाशिक आणि धुळे जिल्ह्यात सीएनजीच्या दरात १.५० रुपयांची वाढ केली आहे.

CNG Price Hike : जागतिक युद्धामुळे देशातील कच्च्या तेलाच्या आयातीवर परिणाम झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात होती. दरम्यान आता सीएनजीच्या दरात वाढ झाल्याचे समोर आले आहे. (CNG Price Hike)
महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये सीएनजीच्या दरात १.५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने याबाबत घोषणा केली आहे. (CNG Price Hike)
नाशिक आणि धुळे धुजिल्ह्यातील सीएनजी वाहनधारकांना आज मध्यरात्रीपासून इंधनासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १ रुपया ५० पैशांची वाढ जाहीर केली आहे. (CNG Price Hike)
नव्या दरानुसार सीएनजीचा किरकोळ विक्री दर ९५ रुपये १५ पैसे प्रतिकिलो इतका झाला आहे. यापूर्वी नाशिक आणि धुळे जिल्ह्यात सीएनजीचा दर ९३ रुपये ६५ पैसे प्रतिकिलो होता. मागील काही महिन्यांपासून हा दर स्थिर होता. (CNG Price Hike)
मात्र नैसर्गिक वायुच्या खरेदी खर्चात वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या दरवाढीमुळे खासगी वाहनचालक, रिक्षाचालक आणि व्यावसायिक वाहतूकदारांच्या खर्चात वाढ होणार असल्याने त्यांना आर्थिक फटका बसणार आहे. (CNG Price Hike)




