नाशिकमध्ये रिक्षा-कंटेनरचा भीषण अपघात ; तिघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये ४ वर्षाच्या चिमुरडीचा समावेश

Nashik Accident । नाशिकमध्ये घोटी-सिन्नर महामार्गावर काल मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षा आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहेत. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून यात एका चार वर्षीय चिमुरडीचा समावेश आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताविषयी समोर आलेल्या माहितीनुसार, घोटी-सिन्नर महामार्गावरील एसएमबीटी हॉस्पिटलजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात कंटेनर चालकाने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, रिक्षातील तिघांची जागीच मृत्यू झाला. तर इतर दोनजण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे. रिक्षा चालक अमोल विनायक घुगे (रा. कल्याण), स्वरा अमोल घुगे (4), मार्तंड पिराजी आव्हाड (60), अशी मृतांची नावे आहेत.
कंटेनर चालक पोलिसांच्या ताब्यात Nashik Accident ।
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. कंटेनरच्या जोरदार धडकेमुळे रिक्षाचा चक्काचूर झाला. तर अपघातानंतर पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू केला आहे.
नाशिकच्या उड्डाणपुलावरील अपघातातील मृतांचा आकडा नऊवर Nashik Accident ।
दरम्यान, मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका चौफुलीजवळील उड्डाणपुलावर रविवारी झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. राहुल साबळे याचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. एकुलता मुलगा गमावल्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर अपघातातील इतर गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.





