नाशिकमध्ये दुधाचा टँकर 200 फूट खोल दरीत कोसळला ; 5 ठार, 4 गंभीर जण जखमी

Nashik Accident । नाशिकमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. याठिकाणी एक दुधाचा टँकर खोल दरीत कोसळून हा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. नवीन कसारा घाटाजवळ हा अपघात झाला. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल Nashik Accident ।
अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. परिसरात मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. दोरीच्या साहाय्याने आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या कर्मचाऱ्यांनी खाली उतरून तीन गंभीर जखमींना खड्ड्यातून बाहेर काढले. यानंतर जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून कसारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, दरीत अजूनही तीन ते चार जण अडकले असल्याचा अंदाज आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नैनीज धाम मोफत रुग्णवाहिका रुग्णमित्र कैलास घाटीर यांनी जखमींना इगतपुरी व कसारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात लहान मुलांसह महिलांचाही समावेश आहे.
जखमींची नावे Nashik Accident ।
या अपघातात अक्षय विजय घुगे (वय 30 वर्षे), श्लोक जायभाय (वय 5 वर्षे), अनिकेत वाघ (वय 21 वर्षे), मंगेश वाघ (वय 50 वर्षे) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कसारा आणि उपजिल्हा रुग्णालय शाहपूर येथे उपचार सुरू आहेत.
मृतांची नवे
मृतांमध्ये विजय घुगे (वय 60 वर्षे), रा. निमोण तालुका संगमनेर, आरती जायभाय (वय 31 वर्षे), रा. नालासोपारा, सार्थक वाघ (वय 20 वर्षे), रा. निहाल तालुका सिन्नर, रामदास दराडे (वय 50 वर्षे) यांचा समावेश आहे. , सिन्नर येथील रहिवासी योगेश आढाव राहुरीसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा
“भटकत्या आत्म्याची भीती अजूनही उतरली नसावी म्हणून मोदी साहेब…” ; रोहित पवारांची पंतप्रधानांवर टीका





