Naseem Shah Controversy : ‘तिला लॉर्ड्सच्या राणीसारखी वागणूक का देताय?’ नसीम शाहची महिला मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त पोस्ट
Naseem Shah Controversy : वादाचे स्वरूप वाढल्याचे पाहून नसीम शाहने ती पोस्ट डिलीट केली आणि स्पष्टीकरण दिले.

Naseem Shah controversial post about CM Maryam Nawaz Sharif : पाकिस्तान क्रिकेट वर्तुळात सध्या मैदानाबाहेरच्या एका मोठ्या वादाने खळबळ उडवून दिली आहे. पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज नसीम शाह याने पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफ यांच्याबद्दल केलेल्या एका उपरोधिक पोस्टमुळे तो आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) कचाट्यात सापडला आहे.
पीएसएलच्या ११ व्या हंगामातील सलामीच्या सामन्यानंतर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह मोठ्या संकटात सापडला आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या सामन्यादरम्यान मुख्यमंत्री मरियम नवाझ शरीफ व्हीआयपी पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पीसीबीने त्यांच्या उपस्थितीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता, जो नसीम शाहने रिपोस्ट करत वादग्रस्त टिप्पणी केली.
नेमकं प्रकरण काय?
The Pakistan Cricket Board (PCB) has issued a show-cause notice to cricketer Naseem Shah over a tweet criticizing CM Punjab Maryam Nawaz, raising questions about players’ conduct on social media during the #HBLPSL11 season.#naseemshah #maryamnawaz #psl pic.twitter.com/2oJ68KYIpw
— xplorism.pk (@Xplorismpk) March 28, 2026
पीसीबीने शेअर केलेल्या मरियम नवाझ यांचा व्हिडिओ नसीम शाहने रिपोस्ट करत लिहिले की, “त्यांना ‘लॉर्ड्सच्या राणी’सारखी वागणूक का दिली जात आहे?” नसीमची ही टिप्पणी काही वेळातच वाऱ्यासारखी पसरली आणि राजकीय वर्तुळातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सरकारी दबावानंतर पीसीबीने तात्काळ दखल घेत नसीम शाहला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट आणि मीडिया नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी केली आहे.
‘अकाऊंट हॅक’ झाल्याचा दावा –
PCB issues show-cause notice to Naseem Shah over alleged breach of central contract and media policy. The fast bowler has been asked to respond within a stipulated time.https://t.co/RyYuLANiMe#PCB #NaseemShah #Cricket #PSL #PakistanCricket #BreakingNews pic.twitter.com/qZNroaqaYn
— The Public Purview (@publicpurviewpk) March 28, 2026
वादाचे स्वरूप वाढल्याचे पाहून नसीम शाहने ती पोस्ट डिलीट केली आणि स्पष्टीकरण दिले. त्याने दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटले की, “माझे सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाले होते, जे आता यशस्वीरित्या रिकव्हर करण्यात आले आहे. मागील टिप्पणी ही माझे वैयक्तिक विचार दर्शवत नाही.” मात्र, बोर्डाला त्याचे हे स्पष्टीकरण पुरेसे वाटलेले नाही.
पीसीबीची शिस्तभंग कारवाई –
CM Punjab Maryam Nawaz Sharif at PSL 2026 Opening Ceremony ❣️@MaryamNSharif #MaryamNawazSharif #cmpunjab #PMLN #mns_supreme pic.twitter.com/NW4Kho72mF
— Anaya Kareem (@MNS_Supreme) March 27, 2026
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “नसीम शाहविरुद्ध शिस्तभंग कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्याला ठराविक मुदतीत आपले उत्तर द्यावे लागेल. खेळाची प्रतिष्ठा आणि करारातील जबाबदाऱ्यांचे पालन करण्याबाबत बोर्ड कटिबद्ध आहे.” नसीमच्या उत्तरानंतर त्याच्यावर निलंबनाची किंवा दंडाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.





