Narhari Zirwal : कार्यक्षेत्राच्या बाहेर कारवाया केल्यास निलंबन करणार; मंत्री नरहरी झिरवाळांची एफडीएच्या अधिकाऱ्यांना वॉर्निंग
काही ठिकाणी अधिकाऱ्यांकडून नियमाच्या बाहेर जाऊन कारवाई होत असल्याचीही तक्रार आस्थापनाधारकांची आहे. त्याच, पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरळी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी अधिकाऱ्यांना वॉर्निंग दिली आहे.

Narhari Zirwal : राज्यात सध्या एफडीएच्या कारवाईचे सत्र सुरु असून विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार भेसळयुक्त आणि अनियमितता आढळल्यास परवाने निलंबनाची देखील कारवाई होत आहे. मात्र, काही ठिकाणी अधिकाऱ्यांकडून नियमाच्या बाहेर जाऊन कारवाई होत असल्याचीही तक्रार आस्थापनाधारकांची आहे. त्याच, पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी अधिकाऱ्यांना वॉर्निंग दिली आहे.
एफडीए अंतर्गत कारवाई करताना कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्या असतील आणि त्यात ते दोषी आढळले तर, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी दिला. मात्र, याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा झाली आहे.
या घटनेत काय कारवाई करावी, याबाबत मुख्यमंत्री निर्णय देतील. मात्र, यामध्ये जे पाच-सात अधिकारी किंवा अन्य कोणीही दोषी आढळून आले आहे, त्यांवर निश्चितरित्या कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच एफडीएमधील 5 अधिकाऱ्यांवरील निलंबनाच्या कारवाईवरुन रणकंदन माजले होते.
नाशिक जिल्ह्याच्या मालेगावर येथील सुपाऱ्यांच्या ट्रकवरुन करण्यात आलेल्या कारवाईत भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घेत संबंधितांवर निलंबनाची कारवाई (Narhari Zirwal) सुरू केल्याची माहिती आहे.






