‘अरे गांजावाल्या… तुला लाज वाटते का? कुठेतरी ओकायचं थांब’; नरेश म्हस्केंची संजय राऊतांवर जहरी टीका

मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाचे फलीत असून या हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार आहेत, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यांच्या या टीकेला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतित्युत्तर दिलं आहे. अरे गांजावाल्या… तुला थोडी लाज वाटते का? अशा शब्दात नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे.
नेमकं काय म्हणाले नरेश म्हस्के?
दहशतवादी हल्ला आपल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांवर झालाय. त्या भ्याड दहशतवाद्यांनी निरागस, निष्पाप लोकांना वेठीस धरले. धर्म विचारुन गोळ्या घातल्यात रे, तू त्याच्यावर राजकारण करतोस???? शरम वाटली पाहिजे तुला…. हा देशावरचा हल्ला आहे. कुठेतरी ओकायचं थांब…?? वेळ प्रसंग बघून तरी ओकत जा. तुझ्या ओकाऱ्यांनी सुरक्षा यंत्रणा सरकार यांना काही फरक पडणार नाही… ते त्यांचं कर्तव्य परमनिष्ठेने करतात, करतील… आणि तुझ्याकडून सल्ला घेण्या इतकी वाईट वेळ त्यांच्यावर आलेली नाही.
कोविड सारख्या जागतिक संकटातही स्वतःच्या तुंबड्या भरणारे तुमच्यासारखे लांडगे केंद्रात बसलेले नाहीत… तू तुझे भोंगे तुझ्या डबक्यात वाजवत राहा… राष्ट्रीय सुरक्षा वगैरे तुझ्या आवाक्यातले विषय नाहीत अशी टीका नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांवर केली.
काय म्हणाले होते संजय राऊत?
जम्मू काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाचे फलीत असून या हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार आहेत, नेहमी राजकारणात गुंतलेले आणि सरकारे पाडण्याची कटकारस्थानी गृहमंत्री अमित शहा यांचे देशाचे सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. राजकारणातून त्यांना सुरक्षेकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे या घटनेला जबाबदार असलेल्या शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली होती.
तसेच सामान्य माणसांसाठी सुरक्षाव्यवस्था नसल्याचे प्रमुख कारण म्हणजे लष्करात सुमारे दोन लाख पदे रिक्त आहेत, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला होता. जम्मू कश्मीरमधील दहशतवाद संपत असल्याचा दावा मोदी, शहा करत होते. मात्र, प्रत्यक्षात जम्मू कश्मीरमधील दहशतवाद वाढत आहे. संसदेत हे रेटून खोटे बोलत आहेत, असा आरोपही संजय राऊत यांनी केला होता.
अरे गांजावाल्या @rautsanjay61 संजा, तुला थोडी लाज वाटते का?
दहशतवादी हल्ला आपल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांवर झालाय… त्या भ्याड दहशतवाद्यांनी निरागस, निष्पाप लोकांना वेठीस धरले… धर्म विचारून गोळ्या घातल्यात रे…तू त्याच्यावर राजकारण करतोस???? 😡😡😡😡 शरम वाटली पाहिजे… pic.twitter.com/YzN6gZMT1X— Naresh Mhaske (@nareshmhaske) April 23, 2025





