Narendra Modi : पाकिस्तानचं काय खरं नाही.! पंतप्रधान मोदी थेट म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित, येणाऱ्या दिवसात….”

Updated On:

Narendra Modi : सध्याच्या युद्धजन्य काळात सगळीकडे अनिश्चिततेचं वातावरण आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव पूर्णपणे मिटलेला नाही. असे असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (दि. 12) देशातील जनतेशी संवाद साधला.

नरेंद्र मोदी यांनी रात्री 8 वाजता संपूर्ण देशाल संबोधित केलं असून, यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केल्याचं पाहायला मिळालं. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी परस्पर युद्धबंदीचा करार केल्यानंतर तब्बल दोन दिवसांनी पंतप्रधानांचे हे भाषण झाले आहे.

तसेच, आज भारतीय लष्कराच्या तिन्ही प्रमुख दलाच्या पत्रकार परिषदेत ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि भारत आणि पाकिस्तानमधील सद्यस्थितीबद्दल माहिती देण्यात आली आहे. यावेळी भारतीय लष्कराने पाक लष्कराशी आमचा लढा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “या दहशतवादी हल्ल्यानंतर, संपूर्ण राष्ट्र, प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग, प्रत्येक राजकीय पक्ष दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईसाठी एका आवाजात उभा राहिला.

आम्ही देशाच्या सैन्याला दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोकळीक दिली. आज प्रत्येक दहशतवादी, प्रत्येक दहशतवादी संघटना आपल्या बहिणी आणि मुलींच्या कपाळावरील सिंदूर काढून टाकण्याचे परिणाम काय होतात हे जाणते.”

मोदींनी सांगितले, “पाकिस्तानने भारतासोबत आतंकवादाविरुद्ध उभं न राहता, भारताला लक्ष्य केलं आहे. पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि मंदिरं, गुरुद्वारं यांवर हल्ला केला. पण भारताने पाकिस्तानचे ड्रोन वेळीच उडवले.

भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील आतंकवादी ठिकाणांवर हल्ला केला. आतंकवाद्यांना कधीच असं वाटलं नव्हतं की भारत इतके मोठे पाऊल उचलू शकेल. जेव्हा भारतीय मिसाईल्स आणि ड्रोनने पाकिस्तानच्या त्या ठिकाणांवर हल्ला केला, तेव्हा ती फक्त आतंकवाद्यांची इमारत नाही, तर त्यांचा धैर्यही नष्ट झाले”

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय, यापुढे पाकिस्तान काय भूमिका घेतो, हे पाहणार, असा सूचक इशारा दिला. पाकिस्तानकडून जेव्हा सांगितलं गेलं की त्यांच्याकडून पुढे कोणतीही दहशतवादी कारवाई केली जाणार नाही.

सैन्य गोळीबार होणार नाही. त्यावर भारताने विचार केला. आम्ही पाकिस्तानचे दहशतवादी आणि सैन्य ठिकाण्यावर प्रत्युत्तर म्हणून आता फक्त स्थगित केलं आहे. येत्या काळात आम्ही पाकिस्तान काय भूमिका घेतो कसा वागतो हे पाहणार आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : 'मोर्चा रोखू शकता, पण आमची इच्छाशक्ती नाही'; सुटका झाल्यानंतर राहुल गांधींचा इशारा

2026-10-07 22:53:07

Rahul Gandhi : 'मोर्चा रोखू शकता, पण आमची इच्छाशक्ती नाही'; सुटका झाल्यानंतर राहुल गांधींचा इशारा

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

2026-10-07 19:04:11

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा