Narendra Modi : पंतप्रधान दबावाखाली काम करत आहेत; ‘या’ नेत्याचा मोठा दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पहिल्यांदाच एकतर्फी भारत-अमेरिका व्यापार करार मंजूर केला होता आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली भारताने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करणे थांबवण्याचे मान्य केले होते.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पहिल्यांदाच एकतर्फी भारत-अमेरिका व्यापार करार मंजूर केला होता आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली भारताने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करणे थांबवण्याचे मान्य केले होते, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी तणावाच्या परस्थितीत इस्रायलला का भेट देत आहेत, असा प्रश्न त्यांनी केला.
अलीकडेच अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर आणि एक उच्चस्तरीय नौदल अॅडमिरल चंडीमंदिर येथील पश्चिम लष्कर कमांड मुख्यालयात गेले होते? त्यांना कोणी पाठवले? आतापर्यंत कोणत्याही परदेशी राजदूताला इतक्या संवेदनशील ठिकाणी भेट देण्याची परवानगी नव्हती.
पंतप्रधानांच्या (Narendra Modi) नऊ वर्षांतील दुसऱ्या इस्रायल दौऱ्याचा संदर्भ देत चव्हाण यांनी सांगितले की, अमेरिका इराणवर लष्करी हल्ले करू शकते या भीतीने भारताने दोनच दिवसांपूर्वी आपल्या सर्व नागरिकांना कोणत्याही प्रकारे इराण सोडण्यास सांगितले होते.
काय चालले आहे हे कोणालाही माहिती नसताना अशा प्रतिकूल परिस्थितीत तिथे जाण्याचे कारण काय होते? असा प्रश्न त्यांनी विचारला. संसद आणि संसदीय समित्यांना या गोष्टींबद्दल माहिती दिली जात नव्हती, असा दावा त्यांनी केला आहे.





