नरेंद्र मोदी म्हणाले,’येत्या 10 वर्षात विकासाचा नवा अध्याय लिहिणार’

Narendra Modi । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी महत्वपूर्ण बैठक पार पडत आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांना एनडीएचे नेते म्हणून प्रसवते मांडण्यात आला. तसेच एडीएतील घटक पक्षाने या प्रस्तवाला समर्थन दिले. दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींनी भाषण करताना सर्व घटकपक्षाचे अभिनंदन केले.
नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत भाषण केले. त्यांनी नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, विजयी होऊन आलेले सर्वजन अभिनंदनास पात्र आहेत. पण देशातील लाखो कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र काहीही पाहिले नाही. गर्मी पाहिली नाही. देशातील अनेक कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. मी संसदेच्या सेन्ट्रल हॉलमधून मी त्यांचे आभार मानतो. एनडीएचा नेता म्हणून माझी तुम्ही सर्वसंमतीने निवड केली. या निवडीमुळे मला नवी जबाबदारी मिळाली आहे. यावेळी त्यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आपल्या भाषण उल्लेख केला. तसेच पुढील १० वर्षात सरकार कशा प्रकारे देशाची प्रगती करणार याबाबतही सांगितले.
संसदीय पक्षाच्या बैठकीत पीएम मोदी म्हणाले की, ‘एनडीए सरकारमध्ये आम्ही पुढील 10 वर्षांत सुशासन, विकास आणि सामान्य मानवी जीवनात सरकारी हस्तक्षेप कमी करण्याचा प्रयत्न करू. यातूनच लोकशाही मजबूत होते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला बदल हवा आहे. विकासाचा नवा अध्याय लिहू, असे मोदी म्हणाले. सुशासनाचा नवा अध्याय लिहिणार आहे. एनडीए सरकारने देशाला सुशासन दिले आहे आणि एक प्रकारे एनडीए हा शब्द सुशासनाचा समानार्थी बनला आहे.’





