Narendra Modi : गणेश चतुर्थीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशवासियांना खास शुभेच्छा…! म्हणाले,”विघ्नहर्ताच्या..”
Narendra Modi : देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, घरोघरी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे.

Narendra Modi : देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, घरोघरी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. गणेश चतुर्थीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
भगवान गणेशाचा हा पवित्र उत्सव प्रत्येकाच्या आयुष्यात नवी ऊर्जा, उत्साह आणि समृद्धी घेऊन येवो, तसेच देशाची प्रगती अधिक वेगाने व्हावी, अशी प्रार्थना त्यांनी केली.
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या. “माझ्या सर्व देशबांधवांना गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
देशवासियों को गणेश चतुर्थी की अनंत शुभकामनाएं। विघ्नहर्ता के दर्शन और पूजन का यह पावन पर्व सबके जीवन में नई ऊर्जा और नए उत्साह का संचार करे। उनके दिव्य आशीर्वाद से सभी के प्रयास सफल हों और राष्ट्र निरंतर प्रगति के पथ पर आगे बढ़ता रहे, यही कामना है। गणपति बाप्पा मोरया!… pic.twitter.com/5biHnkWHJ4
— Narendra Modi (@narendramodi) September 14, 2026
विघ्नहर्त्याच्या दर्शनाचा आणि पूजेचा हा पवित्र सण प्रत्येकाच्या जीवनात नवी ऊर्जा आणि उत्साह निर्माण करो. त्यांच्या आशीर्वादाने सर्व कार्ये यशस्वी होवोत आणि राष्ट्र निरंतर प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत राहो,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पोस्टच्या शेवटी त्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया!’ असा जयघोषही केला.
यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी भगवान श्री विनायकाला समर्पित संस्कृत श्लोकही शेअर केला. या श्लोकातून भगवान गणेशाच्या विविध दैवी गुणांचे वर्णन करत त्यांनी विनायकाला वंदन केले. मोदक प्रिय असलेले, साधकांना मुक्तीचा मार्ग दाखवणारे, मस्तकावर चंद्रकोर धारण करणारे आणि भक्तांचे संकट दूर करणारे भगवान गणेश यांना या श्लोकातून नमन करण्यात आले आहे.





