Narendra Modi Live : “टेरर आणि ट्रेड एकसाथ चालणार नाहीत”; पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला कडक शब्दात इशारा

Updated On:

Narendra Modi : सध्याच्या युद्धजन्य काळात सगळीकडे अनिश्चिततेचं वातावरण आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव पूर्णपणे मिटलेला नाही. असे असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (दि. 12) देशातील जनतेशी संवाद साधला.

नरेंद्र मोदी यांनी रात्री 8 वाजता संपूर्ण देशाल संबोधित केलं असून, यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केल्याचं पाहायला मिळालं. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी परस्पर युद्धबंदीचा करार केल्यानंतर तब्बल दोन दिवसांनी पंतप्रधानांचे हे भाषण झाले आहे.

तसेच, आज भारतीय लष्कराच्या तिन्ही प्रमुख दलाच्या पत्रकार परिषदेत ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि भारत आणि पाकिस्तानमधील सद्यस्थितीबद्दल माहिती देण्यात आली आहे. यावेळी भारतीय लष्कराने पाक लष्कराशी आमचा लढा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे !

– पाकिस्तानशी चर्चा झाली तर दहशतवादावर होईल , चर्चा होईल तर पीओके संदर्भातच होईल असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

– भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे अचूकरित्या उद्ध्वस्त केले. दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नव्हती की भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकेल. जेव्हा राष्ट्र सर्वोच्च असते तेव्हा असे कठोर निर्णय घेतले जातात.

– पाकिस्तानला वाचायच असेल तर त्यांना देशातील दहशवाद संपवावाच लागेल. याशिवाय त्यांच्याकडे कोणता पर्याया नाही. टेरर आणि ट्रेड एकसाथ चालणार नाहीत. पाणी आणि रक्त एकावेळी वाहू शकणार नाही.

– या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण राष्ट्र, प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग, प्रत्येक राजकीय पक्ष दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईसाठी एका आवाजात उभा राहिला.

– भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे अचूकरित्या उद्ध्वस्त केले. दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नव्हती की भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकेल. जेव्हा राष्ट्र सर्वोच्च असते तेव्हा असे कठोर निर्णय घेतले जातात. पाकिस्तानच्या मध्यभागी स्थापन केलेले दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले.

– पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आपण सर्वांनी गेल्या काही दिवसांत देशाची ताकद आणि संयम पाहिला आहे. सर्वप्रथम, मी प्रत्येक भारतीयाच्या वतीने भारताच्या बलाढ्य सैन्याला, आपल्या गुप्तचर संस्थांना आणि आपल्या शास्त्रज्ञांना सलाम करतो.

– पंतप्रधान मोदी म्हणाले, “सैन्याने प्रचंड शौर्य दाखवले. आम्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले. आमच्या पर्यटकांना त्यांच्या कुटुंबियांसमोर मारण्यात आले. देशातील वातावरण, सुसंवाद बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ऑपरेशन सिंदूर ही न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे.”

– ऑपरेशन सिंदूर हे न्यायाचे अखंड वचन आहे. ६ मे च्या रात्री, संपूर्ण जगाने हे आश्वासन फलात रूपांतरित होताना पाहिले. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर आणि त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला केला.

– भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकेल, अशी दहशतवाद्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. पण जेव्हा देश एकजूट असतो तेव्हा ठोस निर्णय घेतले जातात आणि निकाल मिळतात.

– आमच्या आई-बहिणींच्या माथ्यावरील सिंदूर हटवण्याचे परिणाम दहशतवाद्यांना कळालाय असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ऑपरेशन सिंदूर देशाच्या माता-भगिनींना समर्पित असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या बैठकांचे सत्र सुरु झाले….

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर मोदी यांनी आपला परदेश दौरा अर्धवट सोडला होता. त्यानंतर मोदींनी देशात येऊन अनेक बैठका घेतल्या होत्या. केंद्रीय गृहराज्यमंत्री, संरक्षणंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, तिन्ही सेनादलाचे प्रमुख यांच्यासोबत मोदी यांच्या महत्त्वाच्या बैठका पार पडल्या.

या बैठकांत राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद, भारताचे पाकिस्तानविरोधातील धोरण अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच या बैठकांनंतरच भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : 'मोर्चा रोखू शकता, पण आमची इच्छाशक्ती नाही'; सुटका झाल्यानंतर राहुल गांधींचा इशारा

2026-10-07 22:53:07

Rahul Gandhi : 'मोर्चा रोखू शकता, पण आमची इच्छाशक्ती नाही'; सुटका झाल्यानंतर राहुल गांधींचा इशारा

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

2026-10-07 19:04:11

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा