‘मुस्लिमांच्या मतांसाठी काँग्रेसचा त्यांच्यापुढे मुजरा’; PM मोदींचा जोरदार हल्लाबोल

Narendra Modi | Congress | Muslim vote – दलित आणि मागासवर्गीयांना देण्यात येणारे आरक्षण कॉंग्रेसने लुबाडून ते मुस्लिमांना देऊ केले आहे. मतांसाठी कॉंग्रेसचे लोक मुस्लिमांपुढे मुजरा करीत आहेत अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
पाटण्यापासून सुमारे ४० किमी अंतरावर असलेल्या पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातील एका सभेत पंतप्रधानांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवला, जिथे त्यांनी अल्पसंख्याक संस्थांमध्ये एससी, एसटी आणि ओबीसींना आरक्षणापासून वंचित ठेवल्याबद्दल आरजेडी आणि काँग्रेस सारख्या पक्षांना दोष दिला.
पंतप्रधान म्हणाले की, सामाजिक न्यायाच्या लढ्याला नवी दिशा देणारी भूमी म्हणजे बिहार. मला त्याच्या भूमीवर घोषित करायचे आहे की मी अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी यांचे आरक्षण लुबाडून ते मुस्लिमांकडे वळवण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न हाणून पाडीन.
व्होट जिहादमध्ये गुंतलेल्यांच्या पाठिंब्यावर विरोधी आघाडी असल्याचा आरोपही त्यांनी केला. ओबीसींच्या यादीत अनेक मुस्लिम गटांचा समावेश करण्याच्या पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय कोलकाता हायकोर्टाने रद्द केल्याचा संदर्भही त्यांनी यावेळी दिला.





