PM मोदींनी पाहिलेलं नवीन स्वप्न काय आहे? स्वतः पंतप्रधानांनी सोलापूरच्या सभेत सांगितलं…..

Updated On:

Narendra Modi । Solapur । Lok Sabha Election 2024 : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून, निवडणुकीला देखील आता चांगलाच रंग चढला आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. महायुतीतून खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात अनेक सभांचे आयोजन करण्यात आलंय. पंतप्रधान मोदींच्या आज आणि उद्या ६ सभा होणार आहेत. त्यातील पहिली सभा सोलापूरमध्ये पार पडली आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात दाखल झालेत. यावेळी त्यांनी सभेला संबोधित करताना काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर सडकून टीका केली. सभेत त्यांनी “माझ्या प्रिय सोलापूरकरांना माझा नमस्कार” असे म्हणत मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली.

तसेच २०२४ मध्ये मी दुसऱ्यांना सोलापूरकरांना भेटायला आलोय. मागच्यावेळी द्यायला आलो होतो आता घ्यायला आलो, मला तुमची धन दौलत नको मी आशीर्वाद घेण्यासाठी सोलापुरात आलोय असे म्हणत त्यांनी सोलापूरकरांना आवाहन केले.

मोदींनी पाहिलेलं नवीन स्वप्न काय? । Narendra Modi । Solapur । Lok Sabha Election 2024

“आम्ही कोणाचाही हक्क हिसकावला नाही. आमच्या समाजिक न्यायाची पद्धत समाजाला जोडण्याची आहे. आता मी ठरवलय गरीब आईच्या मुला, मुलीला डॉक्टर, इंजिनिअर बनवायच. त्यांना मोठ्या पदावर बसवायचं आहे” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. “गरीब मुला-मुलींना इंग्लिश मीडियमध्ये शिक्षण घेणं शक्य आहे का?

आधी मराठी मीडीयममध्ये शिक्षण घेतल्यानंतर टाळ लागायचं. पण आता असं नाहीय, तुम्ही मराठी मीडियममध्ये शिकून डॉक्टर, इंजिनिअर बनू शकता. इंग्रजी नाही आलं, तरी चालेलं तुम्ही देश चालवू शकता, हे मोदीच स्वप्न आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

अशा लोकांच्या हाती तुम्ही देश देणार का? । Narendra Modi । Solapur । Lok Sabha Election 2024

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. त्यांनी देशातील लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यात इंडिया आघाडीचा पत्ता गुल झाला असल्याचे म्हटले. तसेच इंडिया आघाडीत अजूनही महायुद्ध सुरु आहे, त्यामुळे अशा लोकांच्या हाती तुम्ही देश देणार का ? असा सवाल यावेळी मोदींनी सोलपूरकरांना केला.

यावेळी मोदींनी सोलापूरकरांना महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड बहुमताने विजय करा असे अवाहन केले. दरम्यान राम सातपुते यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कॉग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी आणि महायुती असा थेट सामना रंगणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

2026-10-08 23:30:43

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

2026-10-08 22:14:41

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

2026-10-08 18:32:17

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Himanta Biswa Sarma : ...तोपर्यंत तुम्ही मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही; 'या' नेत्याचा राहुल गांधींना इशारा

2026-10-08 17:58:49

Himanta Biswa Sarma : ...तोपर्यंत तुम्ही मोदींच्या केसालाही धक्का लावू शकत नाही; 'या' नेत्याचा राहुल गांधींना इशारा