Narayangaon News : गव्हाळी मळ्यात गोंधळ; बिबट्याचं पिल्लू समजलेलं निघालं उदमांजर

Narayangaon News : दि १४ रोजी नारायणगाव येथील खोडद रोड गव्हाळी मळा या ठिकाणी अमित देविदास शेटे त्यांच्या राहत्या घरासमोरील असणाऱ्या शेडमध्ये त्यांच्या स्वतःच्या गाडीच्या खाली अचानक त्यांना सहा वाजता एक प्राणी आढळून आला याबाबतची माहिती त्यांनी तात्काळ वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांना फोन करून सांगितली. त्यानुसार घटनास्थळी आपदा मित्र मास्टर ट्रेनर सुशांत भुजबळ रेस्क्यू टीम सदस्य आदित्य डेरे, शंतनू डेरे,भरत मुठे वनरक्षक ज्ञानेश्वर पवार घटनास्थळी हजर झाले.
सुरुवातीस स्थानिक नागरिकांना वाटले की हे बिबट्याचेच पिल्लू आहे त्यामुळे नागरिकांमध्ये घाबरटीचे वातावरण तयार झाले. वनविभागाने प्राण्याची व्यवस्थित माहिती घेऊन त्याची खात्री केली असता ते जंगल भागातील राहणारे उदमांजर नावाचा प्राणी आढळून आला. हे प्राणी निसर्गासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे त्यांचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे भारतात १९७२ पासून उदमांजराला संरक्षण दिले आहे त्यामुळे त्याला पकडणे किंवा मारणे कायद्याने गुन्हा आहे.
उदमांजर हा एक लाजाळू एकटा राहणारा आणि रात्री फिरणारा म्हणजे निशाचर प्राणी आहे हा प्राणी भारत श्रीलंका नेपाळ चीन इंडोनेशिया फिलिपिन्स यासारख्या आशियाई देशांमध्ये आढळतो त्याच्या शरीराची लांबी ४० ते ७५ सेमी असते तर शेपटी ४० ते ६० सेमी लांब असते. उदमांजर धावण्यात पटाईत आहे आणि झाडावर पटकन चढू शकतो आजच्या दिवस त्याला जवळ असणाऱ्या उसाच्या शेतामध्ये त्याला निसर्गाच्या सानिध्यात ठेवण्यात येणार आहे.
उदमांजराचा व त्याच्या आईचा संपर्क झाल्यास ते जंगलात निघून जाऊ शकते असे जुन्नर वनविभागाचे वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी सांगितले आहे. दरम्यान, तसे न झाल्यास त्याला पुढील उपचाराकरता माणिकदोह बिबट निवारण केंद्र या ठिकाणी नेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे.





