नरहरी झिरवळ यांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी, शिंदे गटातील नेते म्हणाले…

विधानसभा उपाध्यक्ष पदावर असणाऱ्या झिरवाळ यांनी असे कृत्य करणं त्यांना अशोभनीय आहे. त्यांच्या मागण्यांबाबत सरकार विचार करत आहे. त्यामुळे झालेला प्रकार अयोग्य आहे की योग्य याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नरहरी झिरवाळ यांना भेटू शकतात. चर्चेतून मार्ग निघतात, असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
#WATCH | NCP leader Ajit Pawar faction MLA and deputy speaker Narhari Jhirwal jumped from the third floor of Maharashtra’s Mantralaya and got stuck on the safety net. Police present at the spot. Details awaited pic.twitter.com/nYoN0E8F16
— ANI (@ANI) October 4, 2024
नरहरी झिरवाळ हे दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी पोहोचले होते, मात्र त्याठिकाणीही त्यांची भेट होऊ शकली नाही, असे सांगण्यात येत आहे. यानंतर ते आज पुन्हा मंत्रालयात पोहोचले, तिथे त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही. या रागातून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. नरहरी झिरवाळ यांच्यानंतर इतर काही आदिवासी आमदारांनीही उडी घेतल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यामुळे मंत्रालयात मोठी खळबळ उडाली होती. यावेळी पोलिसांनी सर्वांना जाळ्यातून बाहेर काढले.
धनगर समाजाच्या आरक्षणावरून आंदोलन करणारे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ मंत्रालयाच्या छतावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र उडी मारल्यानंतर झिरवळ सुरक्षा जाळ्यात अडकल्याने मोठा अनर्थ टळला आहे. धनगर समाजाला एसटी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध करताना त्यांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. आपल्या मागण्या ऐकल्या जात नसल्याचे त्यांनी सांगितले, त्यामुळे रागाच्या भरात त्यांनी मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारली. यानंतर त्यांना पोलिसांकडून बाहेर काढण्यात आले. यावेळी मीडियाशी संवाद साधतांना नरहरी झिरवाळ यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.





