Tokyo | नाओमी ओसाका ऑलिम्पिकमध्ये खेळणार
Updated On:

टोकियो – फ्रेंच ओपन तसेच विम्बल्डन टेनिस स्पर्धेतून माघार घेतलेल्या जपानच्या नाओमी ओसाका व सध्या विम्बल्डनमध्ये भरात असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर यांनी आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे.
या दोन्ही खेळाडूंनी यंदाच्या मोसमातील काही स्पर्धांमधून दुखापतीच्या कारणाने माघार घेतली होती. ओसाकाला फ्रेन्स ओपन टेनिस स्पर्धेत माध्यमांशी बोलण्यास नकार दिल्यावर आर्थिक दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते.
त्यानंतर तिने या स्पर्धेतून माघार घेतली होती. तसेच ऑलिम्पिकबाबतही आपला होकार कळवलेला नव्हता. फेडररनेही ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले नव्हते. मात्र, आता हे दोघेही सहभागी होणार असल्याचे जागतिक टेनिस महासंघाने जाहीर केले आहे.





