सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील 9 जणांना विषबाधा

नांदेड : नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांना विषबाधा झाली आहे. त्यातील एका 12 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मिरा खानजोडे असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. सोयाबीनच्या शेंगा खाल्याने विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
काय घडले नेमके?
सिडको येथील रहिवासी बबन खानजोडे यांनी तीन दिवसांपूर्वी नातेवाईकाच्या शेतातून सोयाबीनच्या शेंगा आणल्या होत्या. काही शेंगा भावाच्या कुटुंबीयाना दिल्या. गुरुवारी रात्री सर्वांनी सोयाबीनच्या शेंगा खाल्या. मात्र काही तासानंतर एकापाठोपाठ एकाला मळमळ आणि उलट्या सुरु झाल्या. यानंतर सगळ्यांना नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालय दखल करण्यात आले.
उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या नऊ जणांपैकी दोघांची प्रकृती अत्याव्यस्थ होती. यातील 12 वर्षीय मीरा खानजोडे हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली हे डॉक्टरांचा अहवाल समोर आल्यानंतर समजेल.





