Nanded: “स्वच्छ-सुंदर नांदेडसाठी गणेशभक्तांनी सहकार्य करावे” ; महापौर कविता मुळे यांचे आवाहन
Nanded:
Updated On:

Nanded: अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात गणेश विसर्जनासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आली असून, या केंद्रांवर गणेशमूर्ती देऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन महापौर कविता मुळे यांनी केले आहे.
नांदेड शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सर्व गणेशभक्तांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर कविता मुळे यांनी केले.
विसर्जनासाठी उभारण्यात आलेल्या मूर्ती संकलन केंद्रांवर गणेशमूर्ती देऊन पर्यावरणाचे आणि शहराच्या स्वच्छतेचे भान राखावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी महापौर कविता मुळे यांनी नांदेडकरांसह सर्व गणेशभक्तांना अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा दिल्या.





