Nanded City : नांदेड सिटी प्रवेशद्वार बाजू व समोरील रस्ताच्या बाजू नो पार्किंग झोन
Updated On:

पुणे : नांदेड सिटी प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस आणि समोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूस ५० मीटर नो पार्किंग झोन करण्यात आला आहे. या ठिकाणी पार्किंगसाठी यापूर्वी असलेले आदेश रद्द करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
तरी याबाबत नागरिकांना काही सुचना असल्यास त्या ७ ऑगस्टपर्यंत येरवडा येथील वाहतुक नियंत्रण शाखेच्या कार्यालयात लेखी स्वरूपात कळवाव्यात, असे आवाहन वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.
मात्र, या नो पार्किंग झोनमधून अग्निशामक दल वाहन, रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या वाहनांना सुट देण्यात आली आहे.





