Baramati News : नणंदेची उचलबांगडी, भावजयला संधी! बारामतीत सत्तासंघर्षाचा नवा डाव! नेमकं झालंय काय?

Sinetra Pawar | Supriya Sule | बारामतीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या संस्थेच्या अभ्यागत मंडळावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना हटण्यात आलं आहे. त्यांच्या जागी नव्या अध्यक्ष्यांची निवड करण्यात आली आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष पदी वर्णी लागली आहे. यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्रालयातर्फे हा निर्णय जारी करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ हे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत. अध्यक्षांसह सर्व मिळून एकूण नऊ सदस्यांचा समावेश नव्या मंडळात करण्यात आला आहे. याशिवाय सदस्यांमध्ये पाच शासकीय सदस्यांचा समावेश असणार आहे.
हे आहेत सदस्य
अध्यक्ष सुनेत्रा अजित पवार, सदस्य ज्योती नवनाथ बल्लाळ, डॉ. कीर्ती सतीश पवार, डॉ. सचिन कोकणे, अॅड. श्रीनिवास वायकर, डॉ. दिलीप लोंढे, अविनाश गोफणे, बिरजू मांढरे या 9 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा : ‘१४ पाकिस्तानी दहशतवादी घुसले, ४०० किलो आरडीएक्स, १ कोटी लोक..’ ; मुंबईत हल्ल्याची धमकी





