शरद पवारांच्या भूमिकेबाबत जनतेत संभ्रम – काँग्रेसच्या बड्या नेत्याचे वक्तव्य

Updated On:

Nana Ptole on Sharad Pawar – महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप – शिवसेना (शिंदे) यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले असतानाच दोन्ही गटातील नेते एकमेकांची भेट घेत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. अशातच शरद पवार व अजित पवार यांच्यात झालेली भेट या संभ्रमावस्थेत भर टाकणारी ठरली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आज याबाबत भाष्य केलं आहे.

नाना पटोले यांना शरद पवार – अजित पवार यांच्यामध्ये भेट झाल्यानंतर महाविकास आघाडीत व काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना पटोले यांनी, काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्याबाबत संभ्रम नसून जनतेमध्ये शरद पवारांबाबत संभ्रम निर्माण झालाय अशी प्रतिक्रिया दिली. ते काँग्रेस कोअर कमिटीच्या मुंबईत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

‘मराठी-अमराठी’वर बोलताना राज ठाकरेंनी MNSच्या पंजाबी तालुका अध्यक्षाला उभं केलं अन्…

“शरद पवार हे मोठे नेते आहेत, निर्णय घेण्यास ते सक्षम आहेत आणि त्यांनी या भेटीवर त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. इंडिया आघाडी सोबतच राहणार असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. या सर्व परिस्थितीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते लक्ष ठेवून आहेत, मुंबईतील इंडिया बैठकीच्या वेळी ते शरद पवार यांच्याशी चर्चा करतील.” असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

भाजपसोबत जाणार नाही – शरद पवार 

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत आपण भाजपसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले. भाजप हा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, तसे निर्णयही या पक्षाच्या सरकारकडून घेण्यात आले असल्याचा गंभीर आरोपही यावेळी शरद पवार यांनी केला. महाविकास आघाडीमध्ये कोणताही संभ्रम नाही, आम्ही एकत्र आहोत असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

मोदींच्या ७० हजार कोटींच्या आरोपाची आठवण करून देत अजित पवारांची मिमिक्री – राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

आणखी संबंधित बातम्या

Raj Thackeray : MPSC विद्यार्थ्यांसाठी लवकरच चांगली बातमी? राज ठाकरे पोस्ट करत म्हणाले...

2026-10-09 11:44:51

Raj Thackeray : MPSC विद्यार्थ्यांसाठी लवकरच चांगली बातमी? राज ठाकरे पोस्ट करत म्हणाले...

liquor shops : दारूची दुकाने 9 आणि 10 ऑक्टोबरला दोन दिवस बंद; 'या' कारणामुळे सरकारचा निर्णय

2026-10-08 19:22:36

liquor shops : दारूची दुकाने 9 आणि 10 ऑक्टोबरला दोन दिवस बंद; 'या' कारणामुळे सरकारचा निर्णय

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

2026-10-08 18:32:17

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

Rahul Gandhi : राहुल गांधींची मानसिकता अराजकतावादी; नितीन नवीन यांचा हल्लाबोल

2026-10-08 16:00:09

Rahul Gandhi : राहुल गांधींची मानसिकता अराजकतावादी; नितीन नवीन यांचा हल्लाबोल

INDIA Bloc Protest: इंडिया आघाडीचे खासदार लंचसाठी कॅनॉट प्लेसमध्ये दाखल ; राजघाटाकडे कूच करण्याचे नियोजन

2026-10-08 14:56:29

INDIA Bloc Protest: इंडिया आघाडीचे खासदार लंचसाठी कॅनॉट प्लेसमध्ये दाखल ; राजघाटाकडे कूच करण्याचे नियोजन