मोदींच्या ७० हजार कोटींच्या आरोपाची आठवण करून देत अजित पवारांची मिमिक्री – राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Updated On:

Raj Thackeray on Ajit Pawar – मनसे अध्यक्ष राज ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते अजित पवार यांच्यात अनेकदा शाब्दिक चकमकी उडाल्याच्या पाहायला मिळाल्या आहेत. राज ठाकरे यांनी अनेकदा जाहीर सभांमध्ये अजित पवार यांची मिमिक्री करत त्यांची टिंगल उडवली आहे. यावर अजित पवार यांनी देखील राज ठाकरेंना अस्सल ग्रामीण भाषेत सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. अशातच राज ठाकरे यांनी आज पनवेलमध्ये आयोजित मेळाव्यात, राज्यातील राजकीय घडामोडींवर जोरदार टीका केली आहे. यावेळी, अजित पवार यांच्या सत्तेत सामील होण्यावर भाष्य करताना, राज ठाकरे यांनी त्यांची मिमिक्री केल्याचं पाहायला मिळालं.

पुण्यामध्ये उद्योगपती चोरडिया यांच्या निस्वासस्थानी अजित पवार व शरद पवार यांच्यात भेट झाली होती. या भेटीनंतर अजित पवार एका गाडीत झोपलेल्या अवस्थेत घराबाहेर पडले असा दावा करण्यात आला. अजित पवार माध्यमांच्या कॅमेऱ्यांपासून लपण्याचा प्रयत्न का करत आहेत? असा सवालही उपस्थित करण्यात आला. यावर कोल्हापुरात भाष्य करताना अजित पवार यांनी मंगळवारी (ता.१५) गाडीत झोपलेल्या अवस्थेत बाहेर पडलेला व्यक्ती आपण नसल्याचा दावा केला. अजित पवार यांच्या याच दाव्यावर राज ठाकरे यांनी भाष्य करताना त्यांची मिमिक्री केली.

भाजपवर निशाणा 

“अमित ठाकरे जात होता, तिकडे टोल फुटला तेव्हा भाजपाने टीका केली, रस्ते बांधायला पण शिका, उभे करायला शिका. मला असे वाटते भाजपाने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला पण शिका. लोकांना घाबरवून, त्यांच्या डोक्याला बंदूक लावून त्यांना स्वत:च्या पक्षात घेतलं जात आहे. या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आणि त्यामुळेच राजकारणाची पातळी खालावली आहे.” अशी परखड टीका राज ठाकरे यांनी यावेळी भाजपवर केली.

मोदींचं नाव घेत अजित पवारांवर निशाणा 

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी, पंतप्रधान मोदींचे नाव घेत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “तुम्ही सरकारमध्ये का सामील झालात, या प्रश्नावर काही जण सांगतात की त्यांना महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. ते लोकं खोटं बोलतात. खरं कारण असं असेल की, पंतप्रधानांनी तिकडे भाषणात ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराची गोष्ट काढली, तेव्हा लगेच सगळे सत्तेत सहभागी झाले. कारण भुजबळांनी सांगितलेलं असणार की जेलच्या आतमध्ये काय काय असते. ते म्हणाले असतील की आपण इथे जाऊ पण तिथे (जेलमध्ये) नको.”

आणखी संबंधित बातम्या

Raj Thackeray : MPSC विद्यार्थ्यांसाठी लवकरच चांगली बातमी? राज ठाकरे पोस्ट करत म्हणाले...

2026-10-09 11:44:51

Raj Thackeray : MPSC विद्यार्थ्यांसाठी लवकरच चांगली बातमी? राज ठाकरे पोस्ट करत म्हणाले...

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

2026-10-08 18:32:17

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

Nana Patekar, Raj Thackeray: “नानांनी काही गोष्टी ॲडजस्ट केल्या असत्या तर…” राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

2026-10-08 13:35:12

Nana Patekar, Raj Thackeray: “नानांनी काही गोष्टी ॲडजस्ट केल्या असत्या तर…” राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

2026-10-08 09:49:37

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली