भाजपवर टीका करताना नाना पटोलेंची जीभ घसरली ; म्हणाले, “भाजपाला आता…”

Nana Patole on BJP । राज्यात विधानसभा निवंडुकीचे वारे वाहत आहेत. त्यातच प्रत्येक उमेदवारासाठी प्रचसभा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येत आहेत. याच प्रचारसभेतून एकमेकांवर टीकास्त्र उगारण्यात येत आहे. दरम्यान, अशाच एका प्रचार सभेत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. अकोला येथील काँग्रेसच्या प्रचारसभेला संबोधित करताना हे विधान केले आहे. भाजपबद्दल बोलताना पटोले यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार साजिद खान मन्नन खान यांच्या प्रचारसभेत पटोले बोलत होते. यावेळी त्यांनी ओबीसी समुदायातील लोकांना उद्देशून केलेल्या एका वक्तव्यामुळे भाजपाकडून त्यांच्यावर टीका करण्यात येतीय आहे. नाना पटोले यांनी “भाजपाला आता कुत्रा बनवण्याची वेळ आली आहे”, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
आता भाजपाला कुत्रा बनवण्याची वेळ आली Nana Patole on BJP ।
सभेत बोलताना नाना पटोले यांनी, “इथे ओबीसी समुदायातील लोक देखील बसले आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे की अकोला जिल्ह्यातील ओबीसी समुदायातील लोक भारतीय जनता पार्टीला मतदान करणार आहेत का? कारण हेच लोक तुम्हाला कुत्रा बोलतात. त्यामुळे आता भाजपाला कुत्रा बनवण्याची वेळ आली आहे. यांना इतकी मस्ती आली आहे की हे आता स्वतःला देव संबोधू लागले आहेत”.असे त्यांनी म्हटले.
“एक विश्वगुरू दिल्लीमध्ये बसलेत, दुसरे महाराष्ट्रात तयार होतायेत Nana Patole on BJP ।
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांना पूर्वीपासून लोक देवेंद्र फडणवीस याच नावाने ओळखतात. मला सर्वजण नानाभाऊ म्हणतात. आधी म्हणत होते, आताही म्हणतात आणि पुढेही म्हणतील. तुम्ही सर्वजण मला नानाभाऊ या नावानेच हाक मारता. फडणवीसांना सगळेजण देवेंद्र फडणवीस अशी हाक मारायचे. मात्र, आता त्यांनी स्वतःचं नाव बदललं आहे. ते स्वतःला देवा भाऊ असं संबोधू लागले आहेत. पुढील काही दिवसांत ते त्यांच्या नावापुढचा भाऊ हा शब्द काढतील. त्यानंतर काय राहील?” यावर सर्वांनी ‘देवा’ असं उत्तर दिलं. त्यावर नाना पटोले म्हणाले, “एक विश्वगुरू दिल्लीमध्ये बसले आहेत, दुसरे महाराष्ट्रात तयार होत आहेत”.
दरम्यान, रविवारी (१० नोव्हेंबर) पटोले यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी विचारलं की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील का? त्यावर पटोले म्हणाले, “देवेंद्र फडणवीस कसे काय मुख्यमंत्री होतील कारण ते निवडून येणार नाहीत तसंच त्यांचा पक्षही निवडून येणार नाही. मग ते कसे काय मुख्यमंत्री होतील?”





