महागाईवरून नाना पटोलेंचा मोदी सरकारवर सणसणीत टोला,’महंगाई से हाहाकार, जुमलेबाज़ मोदी सरकार..’

मुंबई – मुंबई – देशभरात कालपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. मात्र यासोबतच सर्वसामान्यांना महागाईला तोंड द्यावे लागणार आहे. कारण एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर लागू झाले आहेत. यंदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 250 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात करण्यात आली आहे.
महंगाई से हाहाकार,
जुमलेबाज़ मोदी सरकार।— Nana Patole (@NANA_PATOLE) April 2, 2022
याच महागाईच्या मुद्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट केले आहे की,‘महंगाई से हाहाकार, जुमलेबाज़ मोदी सरकार’असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान,चार महिन्यांच्या कालावधीनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. तर, घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरही या दरम्यान स्थिर होते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 22 मार्च रोजी 50 रुपयांनी दरवाढ करण्यात आली होती. देशातील अनेक शहरांमध्ये एलपीजी गॅसचे दर 950 च्या घरात पोहचले. तर, पाटणामध्ये 1000 रुपयांचा दर गाठला आहे.





