अखेर नाना पटोलेंनी जागावाटपाचा मुहूर्त सांगितला ; म्हणाले,” आम्ही जागा…”

Nana Patole on seat sharing। भाजपकडून राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पण अद्याप महायुतीचं जागावाटप जाहीर झालेलं नसताना भाजपानं पहिली यादी आधीच जाहीर केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. एकीकडे महायुतीमध्ये जागावाटप झाले नाही तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जागांवर फक्त चर्चाच सुरु असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी जागावाटपाविषयी महत्वाचे विधान केले आहे.
जागावाटपाबाबत काय म्हणाले नाना पटोले? Nana Patole on seat sharing।
काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या आजच्या बैठकी पूर्वी नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मविआच्या प्रलंबित जागावाटपाबाबत विचारणा केली असता त्यांनी “उद्या म्हणजेच २२ ऑक्टोबर रोजी जागावाटप जाहीर केलं जाईल”, असे सांगितले. “महाविकास आघाडीचं ठरलं आहे. उद्या पहिली यादी येईल. आम्ही तिघे मिळून उद्या संध्याकाळी यादी जाहीर करू”, असेही नाना पटोले यांनी यावेळी सांगितले आहे.
विदर्भातील १२ जागांवर काँग्रेसचा दावा Nana Patole on seat sharing।
दरम्यान, महाविकास आघाडीतील मित्र पक्ष काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्या काही जागांवरून वाद सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. विदर्भातील 12 जागांवर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटामध्ये सहमती झाली नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या रामटेक आणि अमरावतीच्या जागा काँग्रेसला दिल्या होत्या, त्यामुळे आता त्यांना विधानसभेच्या जास्त जागा हव्या आहेत. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने 12 जागांवर दावा केला आहे. त्या जागांवर महाविकास आघाडीचा एकही विद्यमान आमदार नसल्यामुळे या १२ जागा मागितल्याचं पक्षाचं म्हणणं आहे. त्यामुळे काँग्रेसने मोठ्या मनाने या जागा शिवसेनेला ठाकरे गटाला द्याव्यात.





