Nana Patole on Harshwardhan Sapkal : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद पुण्यात उमटले. या वक्तव्याच्या निषेध करण्यासाठी भाजपने रविवारी काँग्रेस भवनासमोर आंदोलन पुकारले होते. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागून दोन्ही बाजूंकडून जोरदार दगडफेक करण्यात आली. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानानंतर वाद वाढताच काँग्रेस नेते आणि आमदार नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “हर्षवर्धन सपकाळ काय बोलले मला माहित नाही. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुठल्याही राजाशी होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज देशात नव्हे तर जगात महान आहेत, ” अशी प्रतिक्रिया आमदार नाना पटोले यांनी दिली. हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले होते? टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले पाहिजे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केलं आहे. Yerwada Murder Case : दारूची पार्टी ठरली ‘खूनी पार्टी’! येरवड्यात मित्रानेच संपवला मित्राचा खेळ; थरकाप उडवणारी घटना त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेलं पाहिजे, असे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपने टीकेची झोड उठवली होती. त्यापाठोपाठ आता नाना पटोले यांनीही हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. Nana Patole on Harshwardhan Sapkal Harshvardhan Sapkal पुण्यामध्ये काँग्रेस-भाजपमध्ये राडा दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात पुण्यामध्ये रविवारी दुपारी भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस भवनाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणाव वाढला. या घोषणाबाजीचे रूपांतर बाचाबाचीत झाले. यानंतर काही क्षणातच दगडफेक सुरु झाली. आंदोलकांकडून झालेल्या दगडफेकीत काही कारच्या काचा फुटल्या असून एका काँग्रेस कार्यकर्त्याच्या डोक्याला दगड लागल्याने तो गंभीर जखमी झाला. यावेळी पोलिसांना देखील दगड लागल्याची माहिती आहे. या गोंधळात पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करावा लागला. Nana Patole on Harshwardhan Sapkal हेही वाचा : Purandar Airport : पुरंदर विमानतळाचा ‘टेक ऑफ’! ६ हजार कोटींचे कर्ज उभारणीस परवानगी; थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे